Tuesday, November 24, 2009

रायगडावर जेव्हा शिवपुतळा विराजतो...
7 Jun 2009, 0409 hrs IST

ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या रायगडावरील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शनिवारी मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्य सरकार पुतळा बसवण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ, शिवप्रेमींनीच ६०० किलो वजनाचा ब्रॉन्झचा शिवरायांचा पुतळा बनवून त्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर हा पुतळा आता हलवला जाणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर केल्याने शिवप्रेमींनी रायगडावरच एकच जल्लोष केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३६ व्या राज्याभिषेक सोहळ््याचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर केले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून १० ते १५ हजार शिवभक्त दाखल झाले होते. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी राजदरबारात आली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या पुतळ्याला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 'गेल्यावषीर् सहा जून रोजी सरकारने मेघडंबरीत पुतळा बसवण्यास तत्वत: मान्यता दिली होती, मात्र वर्ष उलटूनही सरकार पुतळा बसवत नसल्याने लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे', असे संभाजीराजे यांनी सांगितले.

...

सरकार नमले

पुतळा हलवण्यासाठी शनिवार सायंकाळी ६ पर्यंतची मुदत शिवप्रेमींना देण्यात आली, मात्र मेघडंबरीत बसवलेला महाराजांचा पुतळा हलवणार नाही असा ठाम पवित्रा हजारो शिवप्रेमींनी घेतला. राष्ट्रवादीचे आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. आपण व संभाजीराजेंना सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चचेर्ला बोलावले असल्याचे ते जनसमुदायाला म्हणाले. शिवभक्त शांत होत नाहीत हे पाहताच 'आता शिवरायांचा पुतळा मेघडंबरीतून हलवला जाणार नाही', अशी ग्वाही त्यांनी दिली.

No comments: