Tuesday, November 24, 2009

मुंबईत सिंहासनाधिष्ठित शिवराय
,









मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

मुंबईतील विधान भवनासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. रायगडावरील होळीच्या माळावरील शिवपुतळ्याप्रमाणेच हे शिवस्मारक सर्वांना प्रेरणादायी ठरेल, अशा भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या.

या वेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मराठी , हिंदी व इंग्रजी भाषांतील चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल एस. सी. जमीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी विधान मंडळ सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू , उत्कृष्ट भाषण आणि जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. त्यात पोवाडा , लेझीम आदी मराठमोळे कलाप्रकार सादर करण्यात आले. राष्ट्रपतींना या वेळी या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे सुवर्णमहोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह असलेली प्रतिकृती भेट देण्यात येणार आली.

या वेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्य विधान मंडळाचे विद्यमान , तसेच माजी आमदारांसह. महाराष्ट्रातील अन्य केंद्रीय मंत्री , लोकसभा , राज्यसभा सदस्य , राज्य सरकारमधील सर्व मंत्रिगण , स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments: