Tuesday, November 24, 2009

बाबासाहेबांविरोधात संभाजी ब्रिगेडची संघर्षाची तुतारी
,








>> म. टा. प्रतिनिधी

अरबी समुदात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवस्मारक समितीवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नियुक्तीस तीव्र आक्षेप घेऊन त्यांची नियुक्ती ताबडतोब रद्द करा अन्यथा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा तीव्र इशारा मराठा सेवासंघ आणि संभाजी ब्रिगेडने दिला आहे. त्यामुळेच एक पाऊल मागे घेत स्मारकाबाबत मंगळवारी रात्री सह्यादीवर होणारी बैठक रद्द झाल्याचे समजते.

'बाबासाहेब पुरंदरे हे शिवदोही आणि जेम्स लेनचे हस्तक' असल्याचा आरोप करून राज्य सरकारने पुरंदरे यांची शिवस्मारक समितीवरून हकालपट्टी करावी, असा ठराव पुरुषोत्तम खेडेकरप्रणित मराठा सेवा संघ संचलित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनात संमत झाला. त्याचवेळी संभाजी ब्रिगेडनेही पुरंदरे यांच्या नियुक्तीस ठामपणे विरोध करून सरकारने निर्णय बदलावा, अशी मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तांेडावर आणि बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी हा विषय टाळावा. या सागरी स्मारकामुळे विरोधकांच्या हाती नाहक वादाचे कोलित मिळू नये, यासाठी स्मारकाच्या कामाच्या प्रगतीसाठी मंगळवारी रात्री आयोजिलेली बैठक रद्द झाल्याचे कळते. छत्रपतींचे सागरी स्मारक उभारण्याच्या कामात राज्याच्या सत्ताधारी आघाडीतील सर्व नेत्यांना विश्वासात घेतले जावे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या स्मारकाबाबत विचार करताना श्ाेय लाटण्यासाठी काँग्रेसने घिसाडघाई करू नये, असा सूर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा असल्याचे समजते. या सगळ्या कारणामुळे ही बैठक रद्द झाल्याचे बोलले जाते.

No comments: